आरोपी नगरसेवक विजय पठारे यांना मे. जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर.
नगर, प्रतिनिधी. (04.सप्टेंबर. 2025.) घटनेची थोडक्यात माहिती अशी की, 09/09/2024 रोजी फिर्यादी नामे निलेश सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की आरोपी नामे विजय पठारे व इतर 20 ते 21 जणांनी मागील भांडणाच्या कारणावरून व तसेच आरोपी यांनी फिर्यादी यांच्या जागेवर बांधलेल्या अवैध बांधकामाबाबत दिलेल्या अर्जाचा राग मनात धरून आरोपी यांनी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने संघटित होऊन कट रचला, सदर फिर्यादीने आरोप लावला की आरोपी यांनी लोखंडी हतोडा, लोखंडी रॉड, लोखंडी पहार व लोखंडी टॉमी अशा हत्यारांनी फिर्यादी व फिर्यादीच्या परिवार सदस्यांवर जीव घेणा हल्ला करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.सदर हत्यार हे अॅम्बुलन्स मधून आणण्यात आले असा आरोपही लावण्यात आला.तसेच सदर मारहाणीत फिर्यादी यांच्या पत्नीचे गळ्यातील सव्वा दोन तोळ्याची पोत व मामाच्या खिशातील पाच हजार रुपये ही जबरदस्तीने काढून घेतले.सदर फिर्यादीनंतर आरोपी यांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अटकपूर्व जामीनसाठी दोन वेळेस अर्ज केला होता परंतु नामदार उच्च न्यायालयाने दोन्ही वेळेस जामीन नामंजूर केल्यामुळे आरोपी विजय पठारे हा 23 ऑगस्ट 2025 रोजी पोलिसांकडे स्वाधीन झाला व त्यानंतर मे. जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये जामीन अर्ज दाखल केला व त्यास मे. जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी व शर्तीवर मुक्त केले.
सदरप्रकरणात आरोपीतर्फे अॅड. महेश तवले यांनी बाजू मांडली व मेहरबान कोर्टाकडून सशर्त जामिन मंजूर करून घेतले. तसेच या कामी अॅड. संजय दुशिंग, अॅड. सतीश गीते, ॲड. विक्रम शिंदे, अॅड. संजय वालेकर, अॅड. देवांशु धोकरीया, अॅड. निळकंठ सावंत, अॅड. किरण रायकर यांनी सहकार्य केले.