केंद्रीय गृहमंत्री मा.ना.अमितभाई शाह यांची दिल्ली येथे जलसंपदा मंत्री मा.ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट..
लोणी, प्रतिनिधी. (06.सप्टेंबर. 2025.) : केंद्रीय गृह व सहकारीता मंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय विखे पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.
प्रवरानगर साखर कारखान्याचे नूतनीकरण, लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व 12 ते 16 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या पिंप्री निर्मळ येथे शिवमहापुराण कथा या कार्यक्रमांसाठी मा.ना.अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील महिन्यात प्रवरानगर दौऱ्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.