भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी उमा कासारे यांच्या वर यशस्वी उपचार..!

Ahmednagar Breaking News
0

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारानंतर डिस्चार्ज..

नगर,प्रतिनिधी.(02.सप्टेंबर.2025.) : सावेडी उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सौ.उमा विजय कासारे (वय ३८) यांच्यावर डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटल, अहिल्या नगर येथे तातडीने व यशस्वी उपचार करण्यात आले. अखेर त्या धोक्याच्या छायेतून बाहेर पडून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात सावेडी भागात भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला करून उमा कासारे यांना गंभीररीत्या जखमी केले होते. हात व पायांवर खोल जखमा झाल्याने नागरिकांमध्ये भय व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या संपूर्ण उपचार प्रक्रियेत मा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी पुढाकार घेत सर्व उपचार मोफत करण्याची जबाबदारी स्वीकारली. हॉस्पिटल प्रशासन, डॉक्टर व परिचारिका वर्गाने तातडीने सेवा पुरवून उमा ताईंना नवजीवन मिळवून दिले.

या उपचार मोहिमेत भाजपा अहिल्या नगरचे शहर सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल वारे यांचेही विशेष सहकार्य लाभले.

उपचारानंतर कृतज्ञता व्यक्त करताना उमा कासारे म्हणाल्या, “डॉ. सुजय दादा यांनी वेळेवर मदत केली नसती, तर माझे प्राण धोक्यात आले असते. हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार.”

स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांनीही या सेवाभावाचे कौतुक करत, “विखे पाटील हॉस्पिटल नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदाता ठरते आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top