श्री.गणेशोत्सव आणि डॉ.विखे पाटील शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न!

Ahmednagar Breaking News
0

सामाजिक जागृती आणि वैद्यकीय सेवाभावाचा प्रेरणादायी संगम..!

डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने आयोजित सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.

अहिल्यानगर,प्रतिनिधी.(31.ऑगस्ट.2025.) :श्री.गणेशोत्सव आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त, डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन डीन डॉ. सुनील म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश मोरे, डॉ. अभिजित मिरेकर, डॉ. किरण आहेर, डॉ. राहुल घोणे, डॉ. ज्ञानेश गागरे, डॉ. नितीन निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

रक्तदान शिबिरात मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, फिजिओथेरपी कॉलेज व नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. विद्यार्थ्यांनी गणेशभक्तीच्या उत्सवात समाजासाठी रक्तदान करून श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नेहा बोन्डे, समाजकार्य विभाग समन्वयक गौतम सगटगिळे, डॉ. अभिनय विघ्नेश, डॉ. कल्पना काळे, ब्लड बँक टेक्निशियन प्रतीक्षा शेळके, रुचिका गुळवे व नर्सिंग स्टाफ विजया काळे यांनी विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण झाले असून, रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यात त्यांचा सहभाग प्रेरणादायी ठरतो आहे. विखे पाटील परिवाराच्या सामाजिक वारशाला उजाळा देणारा हा उपक्रम आरोग्य आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top