सकल मराठा समाज अहिल्यानगर तर्फे मुंबईतील उपोषणस्थळी अन्न - पाण्याची रसद..
नगर, प्रतिनिधी. (31.ऑगस्ट. 2025.) : सकल मराठा समाज अहिल्यानगर गुलमोहररोड शाखेतर्फे मुंबईत जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार सुरु असलेल्या उपोषण स्थळी असलेल्या उपोषण कर्त्यांना अन्न - पाण्याची रसद पाठवण्यात आली.यात विशेषतः फरसाण, बिस्कीट पुडे, केळी, पाणी बोटल पाठविण्यात आले असल्याची माहिती धनंजय पवार यांनी सांगितली.यावेळी वैभव बाहेकर, सतीश पवार, सुनील ठोकळ, प्रतीक लांडगे, धीरज बोरा, दत्तू लोणारे, नितीन शिंदे, हर्षद बेरड, राहुल गायके उपस्थित होते.