!! जय गुरुदेव.!!
विश्वशांतीसाठी 11000 कंठातून उमटणार नाद.
नगर प्रतिनिधी. (27.एप्रिल. 2026.) : गुरुदेव श्री.श्री. रविशंकरजी यांच्या 70 व्या जन्मोत्सव निमित्त व नगर आर्ट ऑफ लिव्हिंग शाखेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त शुक्रवार दि.15 मे 2026 रोजी सायं. 06:30 वा. बंधन लॉन, अहिल्यानगर येथे सामुदायिक पसायदान पठण व स्वरमयी भजन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भजन गायक विक्रमजी हाजरा भैय्या यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी विना मूल्य असणार आहे अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. तरी नगर मधील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.