श्री.स्वामी समर्थ मठात प्रभाग क्रमांक तीनच्या राष्ट्रवादी काँग्रेस - भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ.

Ahmednagar Breaking News
0

अहिल्यानगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीनच्या राष्ट्रवादी काँग्रेस - भाजपा युतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा श्री.स्वामी समर्थ मठात शुभारंभ.

नगर, प्रतिनिधी. (03.जानेवारी. 2026.) : आज सकाळी श्री.स्वामी समर्थ मठ,गुलमोहर रोड,सावली सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - भाजपा युतीच्या चारही उमेदवारांनी स्वामींचे दर्शन घेऊन  प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष प्रिया जानवे, छाया राजपूत यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

यावेळी प्रभाग क्रमांक तीनच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार ) उमेदवार सौ.ज्योती अमोल गाडे, सौ.गौरी अजिंक्य बोरकर, तसेच भारतीय जनता पार्टीचे सौ.उषा शिवाजीराव नलावडे, अॅड.ऋग्वेद महिंद्र गंधे यांनी नागरिकांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top