जयस्तंभ पेरणे येथे मानवंदना देणेकारिता होणाऱ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या गर्दीला पर्याय म्हणून वाहतूक पर्यायी मार्गाचा उपयोग करावा.: पोलीस अधीक्षक.

Ahmednagar Breaking News
0

जयस्तंभ पेरणे येथे मानवंदना देणेकारिता होणाऱ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या गर्दीला पर्याय म्हणून वाहतूक पर्यायी मार्गाचा उपयोग करावा.: पोलीस अधीक्षक.

नगर, प्रतिनिधी.(31.डिसेंबर. 2025.) : पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत मौजे पेरणे ता हवेली जी पुणे येथे दि एक जानेवारी 2020 रोजी जयस्तंभ कार्यक्रम होणार असून सदर जयस्तंभ पेरणे येथे मानवंदना देणे करीता मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे जयस्तंभ पेरणे येथे मानवंदना दिल्यानंतर त्यातील लाखोंच्या संख्येने लोक मौजे वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी भेट देऊन समाधीचे दर्शन घेत असतात जयस्तंभ पेरणे येथील कार्यक्रम अहिल्यानगर पुणे महामार्ग लगत असून कार्यक्रमाकरिता येणारे नागरिकांमुळे सदर महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच अहिल्यानगर पुणे महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून सदर महामार्गावरील वाहनाचा कार्यक्रमांकरिता आलेले नागरिकांना धक्का लागून अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही दि 31 डिसेंबर 2025 रोजी चे 00:01 ते दि. 02 जानेवारी 2026 रोजीचे 06:00 वा. पावेतो अहिल्यानगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुणे कडे जाणारी वाहतूक तसेच अहिल्यानगर कडून सरळ पुणे कडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतूक खालील पर्यायी मार्गाने वळविणे नियोजित आहे.

1) अहिल्यानगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुणे कडे जाणारे वाहतुकीसाठी पर्याय मार्ग.

👉 बेलवंडी फाटा- देवदैठण- धावलगाव -पिंपरी कोळंडर- उक्कडगाव -बेलवंडी- अहिल्यानगर दौंड महामार्गावरून- लोणी व्यंकनाथ- मढे वडगाव -काष्टी -दौंड- सोलापूर पुणे महामार्ग मार्गे पुणे.

2) अहिल्यानगर कडून सरळ पुणे कडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकी करिता पर्यायी मार्ग.

 👉कायनेटिक चौक /केडगाव बायपास -अरणगाव बायपास- कोळगाव -लोणी व्यंकनाथ- मढे वडगाव -काष्टी -दौंड -सोलापूर पुणे महामार्ग मार्गे -पुणे.

3) अहिल्यानगर कडून पुणे मार्गे मुंबई,नवी मुंबई,ठाणे कडे जाणारे सर्व प्रकारचे वाहतुकी करिता पर्याय मार्ग.

👉कल्याण बायपास -आळेफाटा- ओतुर -माळशेज घाट मार्गे.

बेलवंडी फाटा येथून पुणे कडे जाणारे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असून त्यांनी उपरोक्त मार्गाचा अवलंब करावा.

 प्रस्तुत आदेश शासकीय वाहने जय स्तंभास अभिवादन करणे कामी जाणारे नागरिकांची वाहने, ॲम्बुलन्स,फायर ब्रिगेड व अत्यावश्य कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top