प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेविका वीणा बोज्जा व श्रीनिवास बोज्जा अपक्ष लढणार.- श्रीनिवास बोज्जा.

Ahmednagar Breaking News
0

प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेविका वीणा बोज्जा व श्रीनिवास बोज्जा अपक्ष लढणार.- श्रीनिवास बोज्जा.

नगर, प्रतिनिधी. (31.डिसेंबर. 2025.)  : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 6 मधून सौ.वीणा बोज्जा यांनी भारतीय जनता पक्षाकडे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढविण्याचे निश्चित केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी वगळता इतर कोणत्याही पक्षांकडे उमेदवाराची मागणी नव्हती तर या पक्षांकडेही काही प्रभागात उमेदवारही नव्हते तर इतर पक्ष खिरापती सारखे उमेदवारांना ए बी फॉर्म वाटत होते ही फार मोठी शोकांतिका आहे. या निवडणुकीत अनेक अर्ध्या हळकुंडाणे पिवळे झालेले उमेदवार उभे असलेले दिसून येत आहे.

उमेदवार कसा असावा याची कोणतीही नियमावली कोणत्याही पक्षांकडे दिसून आली नाही, जो तो पक्ष आपले कोरम पूर्ण करण्यामध्ये मग्न होता, फक्त उमेदवार कसा निवडून येईल किंवा त्याची परिस्थिती निवडून येण्याची आहे का इतकेच पाहून तिकीट वाटप होत होते. उमेदवार आपल्या पक्षासाठी किती वर्ष काम केले, उमेदवार सुशिक्षित आहे का, उमेदवाराचे चरित्र कसे आहे, उमेदवाराला महापालिकेचे ज्ञान आहे या गोष्टीची कोणत्याही पक्षाने पडताळणी केले नसल्याचे दिसून आले या मुळेच की काय चांगले, सुशिक्षित, अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते या निवडणुकीतून माघार घेतल्याचे दिसून आले, किंबहुना अपक्ष उभे राहणेच पसंत केले. 

आता सर्व मदार मतदारांची आहे, मतदाराने आपला प्रभागातील उमेदवार निवडून देतांना तो उमदेवार सुशिक्षित आहे का, अभ्यासू आहे, तरुण आहे की वयोवृद्ध, सामाजिक कार्याची आवड आहे की, निवडून आल्यानंतर आपले पोट भरण्याचे साधन निर्माण करेल, जनतेचा रक्षक होईल की भक्षक या सर्व गोष्टीची पडताळणी करून मतदान करणे काळाची गरज आहे. या निवडणुकीत अनेक उच्च शिक्षित उमेदवारांना उमेदवारी दिली नाही, अनेक वर्षानुवर्षे काम करणाऱ्या पक्षीय कार्यकर्त्यांना डावलण्यात आले तर कोणतेही जातीय समीकरण न लावता सर्व समाजाना न्याय कसे मिळेल हे न पाहता फक्त आणि फक्त आर्थिक परिस्थिती पाहून व पुढाऱ्यांनी आपला जवळचा आपले सोई सुविधा पूरवीणाऱ्या कार्यकर्त्याला की जो पक्षाचा काम कमी व पुढाऱ्याचे जास्त करेल अश्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याचे दिसून येत आहे.

मतदार राजाने लोकशाहीचा आधारस्तंभ होण्याची हिच वेळ असून कोणत्याही गोष्टीच्या प्रलोभाणाला बळी न पडता सुशिक्षित, समाजाची जाण असणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top