मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील वास्तव्याच्या पवित्र स्थळाला भेट देऊन स्मृतीस केले विनम्र अभिवादन.
नगर, प्रतिनिधी.(23.ऑगस्ट.2025.) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील London School of Economics मध्ये उच्च शिक्षण घेतले आणि पुढे भारताला अद्वितीय संविधानाची देणगी दिली.
आज त्यांच्या शिक्षणाशी जोडलेल्या त्या ऐतिहासिक स्थळासह, लंडनमधील त्यांच्या वास्तव्याच्या पवित्र स्थळाला मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, मा.खा.सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन महामानवांच्या अद्वितीय कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन केले.