महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने सामाजिक कार्याची दखल घेत सामाजिक उपक्रमात राज्यात प्रथम..
नगर,प्रतिनिधी.(23ऑगस्ट. 2025.) : महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना (पुणे) अहिल्यानगर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शहरात झालेल्या संघटनेच्या कार्यक्रमात जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव इंजि. प्रकाश भामरे व सेवानिवृत्त सहसचिव इंजि. मनोहर पोकळे यांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी कोषाध्यक्ष नागनाथ बोल्ली, सचिव रामदास साळी, बाबासाहेब लांडगे, दिलीप थिटे आदी उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे हे जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी असून, ते स्वखर्चाने फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 32 वर्षापासून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणत आहे. या सेवेच्या माध्यमातून अनेकांना नवदृष्टी मिळाली आहे. तर नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करुन अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले आहे. तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीसह विविध सामाजिक उपक्रम सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन यामध्ये बोरुडे यांच्या कार्याची दखल घेऊन सामाजिक उपक्रमात त्यांना राज्यात प्रथम क्रमांकाने कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.