वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्यांविरूध्द गुन्हे शाखेची कारवाई.

Ahmednagar Breaking News
0

वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्यांविरूध्द गुन्हे शाखेने कारवाई करून रुपये 6,10,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त..



पाथर्डी, प्रतिनिधी. (20.जानेवारी. 2026.) : कोरडगाव, ता.पाथर्डी येथे वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्यांविरूध्द गुन्हे शाखेने कारवाई, करून आरोपीकडून रु. 6,10,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.  

मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थागुशा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. 

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग पोलीस अंमलदार दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, भिमराज खर्से, किशोर शिरसाठ यांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले. 

दिनांक 19/01/2026 रोजी वर नमुद पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळु उत्खनन/उपसा बाबत माहिती काढत असताना. पथकास गुप्त बातमीदारा मार्फत कोरडगाव गावचे शिवारातील नाणी नदीमध्ये अमरधाम जवळ र्ट्क्टरच्या सहाय्याने चोरटी वाळु वाहतुक चालु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम ट्रक्टर मध्ये वाळु भरतांना दिसुन आला तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकुन इसमास ताब्यात घेवुन त्याचे नांव गावा विचारले असता त्याने त्याचे नांव संकेत राम गोरे वय- 19 वर्षे रा. कोरडगाव ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वाळु वाहतुकीचे परवान्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचेकडे कोणताही वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याचे कळविले. ताब्यातील इसमाकडे ट्रक्टर मालाबाबत विचारपुस करता त्याने सदरचा ट्रक्टर स्वतःच असल्याचे सांगितले आहे. 

ताब्यातील इसमाचे कब्जातुन 6,00,000/- रुपये किमतीचा विना नंबरचा न्यु हॉलंड कंपनीचा ट्रक्टर, 10,000/-रु कि.ची 1 ब्रास वाळु असा एकुण 6,10,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपीविरुध्द पोकॉ/782 किशोर आबासाहेब शिरसाठ नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 59/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे. 

सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top