वृषाल एकबोटे यांनी रेखाटलेल्या "परमवीर चक्र विजेत्या व्यक्तींच्या " चित्रांचे प्रजासत्ताक दिनाचे औचित साधून चित्र प्रदर्शन.
नगर प्रतिनिधी. (26.जानेवारी.2026.): 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पोलीस परेड ग्राउंड,अहिल्यानगर येथे "परमवीर चक्र विजेत्या व्यक्तींचे " चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते.त्याचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी विखे पाटलांनी वृषाल एकबोटे यांनी अनोख्या चित्रांचे रेखाटन करून भावी पिढीला आपल्या देशातील " परमवीर चक्र " विजेत्यांची माहिती करून दिली असे सांगून त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी मा.डॉ.पंकज आशिया, पोलीस अधीक्षक मा.सोमनाथ घार्गे, भाजपा शहरजिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, नगरसेवक निखिल वारे,धनंजय जाधव, मोहित पंजाबी यांसह जिल्यातील शासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह विध्यार्थी उपस्थित होते.
