अहिल्यानगरमध्ये प्रचारादरम्यान मंत्री पंकजाताई मुंडे यांची माजी नगरसेवक रामदास आंधळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
मा.खा.सुजय विखे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती.
अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी–भाजप युतीच्या प्रचारासाठी शहरात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांनी माजी नगरसेवक रामदास आंधळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.या भेटी दरम्यान माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप,आमदार मोनिकाताई राजळे,भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, बाबासाहेब सानप, राहुल आंधळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, यावेळी स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मा.नगरसेवक रामदास आंधळे यांनी ABN शी बोलताना सांगितले.
